शंकर जगताप हे पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे एक प्रभावी व समाजाभिमुख नेतृत्व आहे. पिंपरी चिंचवडचा झपाट्याने होत असलेला विकास आणि शहराच्या भागातील बदल ही त्याच्या कार्याची जाणीव करून देणारी ठळक उदाहरणे आहेत. एका सर्वसामान्य धार्मिक कुटुंबात १९७४ मध्ये पिंपळे गुरव या गावात जन्मलेल्या शंकर जगताप यांनी लहानपणापासूनच समाजसेवेची नाळ घट्ट जोडली. स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. एमबीए (फायनान्स) शिक्षण घेतल्यानंतर शेती व बांधकाम व्यवसायात यश मिळवत त्यांनी सामाजिक विकासाशी व्यावसायिक दृष्टिकोन यशस्वीपणे जोडला. शैक्षणिक व सामाजिक योगदान
शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची उन्नती करणे हे त्यांचे मुख्य ध्येय राहिले आहे. ‘द न्यू मिलेनिअम इंग्लिश मीडियम स्कूल’ व ‘चिंतामणी विद्यापीठ, पुणे’ या संस्थांमार्फत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षणासोबतच गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करून सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि नैतिक मूल्यांवर आधारलेला समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. शंकर जगताप हे केवळ राजकारणी नेते नसून एक दूरदृष्टी असलेले, विकासाभिमुख विचारांचे आणि समाजाशी बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत.
Demo signature used temporarily.
पुणे जिल्ह्यातील सिंहगड रोड भागात धार्मिक व सामाजिक कुटुंबात जन्म.
आर्थिक क्षेत्रातील सहभागा द्वारा विविध सामाजिक कार्याच्या वाटचालीला सुरुवात केली.
नागरिकांच्या समस्या जाणून घेणं, स्वखर्चाने सार्वजनिक काम करण्यास प्रारंभ.
“द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कूल” स्थापून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काम.
उच्च शिक्षणासाठी नव्या योजना उपक्रमात सहभागी होण्याचे नेतृत्व स्वीकारले.
नागरिकांच्या प्रलंबित समस्यांचे पुणे व सिंहगड विभागातील निवासस्थाने तयार निर्माण.
विविधशाखीय हस्तक्षेपात निश्चित देशभक्ती आणि उत्तम नेतृत्व यांनी समाजात ओळख.
पिंपरी-चिंचवडची आव्हाने आणि क्षमता यांची सखोल माहिती घेऊन शंकर पांडुरंग जगताप हे सर्वसमावेशक प्रगतीसाठी कटिबद्ध असलेले नेते म्हणून उदयास आले आहेत. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यापासून ते नागरी समस्यांचे निराकरण करण्यापर्यंत, त्यांनी उचललेले प्रत्येक पाऊल सार्वजनिक सेवेच्या उद्देशाने आणि उत्कटतेने मार्गदर्शित होते.
श्री. शंकर पांडुरंग जगताप यांनी पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, राजकीय आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एक सक्रिय कार्यकर्ते, समाजसेवक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने कार्य केले आहे.
आजवर आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी कसा करता येईल याचा विचार करून त्यांनी विविध शैक्षणिक
संस्थासाठी कार्य करणे सुरु केले. द न्यू मिलेनिअम इंग्लिश मीडियम स्कूल, सांगवी, पुणे. या संस्थेचे
सचिव पद भूषवित त्यांनी परिसरातील विद्यार्थ्याना उत्तमोत्तम शिक्षण देण्यासाठी प्राधान्य दिले आहे.
तसेच चिंतामणी विद्यापीठ पुणे याचे संचालक पद भूषवित शिक्षण क्षेत्रातील आपल्या सीमा विस्तारल्या आहेत.
आज या संस्थांच्या माध्यमातून हजारो यशस्वी विद्यार्थी घडत आहेत तसेच होतकरू गरीब विद्यार्थ्यांना
शिक्षणासाठी प्रोत्साहन व मदत करण्याचे कार्य करीत आहे.
शैक्षणिक कार्य
क्रीडा क्षेत्र
पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थी तरुणांना विविध खेळांची आवड निर्माण व्हावी त्यांनी विविध स्पर्धांमध्ये
शहराचे प्रतिनिधित्व करावे तसेच क्रीडा क्षेत्राबद्दल प्रोत्साहन मिळावे या भावनेतून लक्ष्मणभाऊ जगताप
कला क्रीडा अकॅडमीची स्थापन केली. या अंतर्गत स्केटींग, सायकलिंग व बास्केट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले. तसेच स्केटींग, सायकलिंग व बास्केट बॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटन, स्वीमिंग, बुद्धीबळ, कॅरम,
व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी कुस्ती या स्पर्धांबरोबरच मॅरेथॉन सारखी भव्य स्पर्धा देखील आयोजित
करण्यात आली.
शारीरिक आणि मैदानी खेळांप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी सन २०१० साली भैरवनाथ उस्तव समिती अंतर्गत
“महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, राष्ट्रीय लॉन टेनिस, भव्य हाल्फ मॅरेथॉन स्पर्धा , सी.एम. चषक
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात मोलाचा वाटा उचलला. सोबतच राज्यस्तरीय बॅडमिंटन, किक बॉक्सिंग शरिर
सौष्ठव (बॉडी बिल्डर) स्पर्धा आयोजित करून खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सन
२०१५ पासून श्री शंकर जगताप यांच्या प्रेरणेतून "आमदार चषक क्रिकेट स्पर्धा " हि भव्य स्पर्धा आयोजित
करण्यात येत आहे.
राजकीय जबाबदाऱ्या निभावताना समाज अधिक समृद्ध झालं पाहिजे यासाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्ररंग गोशाळा ट्रस्ट, भैरवनाथ मित्र मंडळ, पिंपळे गुरव, पुणे, भैरवनाथ
उत्सव समिती, पिंपळे गुरव, पुणे यामाध्यमातून लोकजागृती करण्याचे कार्य केले आहे. अनेक लोकोपयोगी उपक्रम
राबविले आहेत.
स्वच्छतेचा पुरस्कार करीत स्वच्छ भारत अभियान, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या
वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन, दुष्काळग्रस्त भागांसाठी नाम फाउंडेशन मुख्यमंत्री
सहाय्यता निधिस आर्थिक मदत, यशवंत चॅरिटेबल ट्रस्टच्यामार्फत राबविण्यात आलेल्या पवनामाई नदी सुधार
प्रकल्पास श्रमदान, समाजातील विविध घटकातील तरुणांसाठी स्कील डेव्हलपमेंटचे कोर्सेस, तसेच सहकाराचे
महत्त्व जाणून मा. आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालवत असलेल्या श्री गणेश सहकारी बँक, भैरवनाथ
नागरी पतसंस्था, विजयराज नागरी पतसंस्था या संस्थांच्यामार्फत पुढाकार घेऊन नागरिकांना व युवकांना
उद्योग, व्यवसाय, शिक्षण, घरबांधणी, वाहन खरेदी यासाठी आर्थिक मदत करून नागरिकांचे जीवनमान
उंचाविण्यासाठी मदत करण्यात येत आहे.
सामाजिक क्षेत्र
महिला सशक्तीकरण
पुरुषांच्या बरोबरीने आज महीला भगिनी देखील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. त्यांच्यातील
कलागुणांना वाव मिळावा यासाठी पवनाथडी, भिमथडी, आदिवासी जत्रा यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत
आहोत. त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत
आहे.
महिलांमधील कौशल्य विकास वाढावा यासाठी MS-CIT., शिवणकला, तांत्रिक उद्योजकता, पाककला अशा विविध
कोर्सेसचे प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येतात. पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध
क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींना "नारीशक्ती वंदन" या अभियानांतर्गत सन्मानित
करण्यात आले आहे.
आपल्याला मिळालेल्या संधीचा सुयोग्य वापर करीत पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. इ.स. २००७ ते २०१२ दरम्यान पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे नगरसेवक पद भूषवित शहरातील विविध लोकाभिमुख कार्य करण्याची संधी मिळाली पुढे क्रीडा समितीचे सदस्य आणि शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून अधिक व्यापकपणे कार्य करत आले याचे समाधान आहे. विकसित शहराच्या निर्मितीसाठीची ध्येयधोरणे ठरविण्यामध्ये योगदान देता आले. जि संधी आपल्याला प्राप्त होते त्याचा पुरपूर वापर करून घेत आपल्या शहरासाठी जे जे चांगले ते ते करण्यास नेहमीच प्राथमिकता राहिली आहे. श्री शंकर जगताप यांचे संघटन कौशल्य आणि स्थानिक प्रश्नांची सुयोग्य जाण असल्या कारणाने तसेच ते सोडविण्यासाठीची त्यांची तळमळ लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी सोपवली. आज चिंचवड विधानसभा मतदार संघाचे प्रमुख म्हणून कार्यभार यशस्वीपणे ते निभावत आहेत.
राजकीय कार्य
कला क्षेत्र
शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक विकासाबरोबरच समाज कला - सांस्कृतिक दृष्ट्या देखील तेवढंच समृद्ध असणे गरजेचे
असते. नागरिकांना आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा मिळावा, त्यांना आपल्या कुटुंबासमवेत काही
खास आनंदाचे क्षण व्यतीत करता यावेत यासाठी हैप्पी स्ट्रीट सारखा भव्य सोहळा इस २०१९ पासून श्री शंकर
जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये विवीध खेळ आणि योगा, व्यायाम, झुम्बा,
नृत्य अशा विविध प्रकारांचा समावेश करीत हैप्पी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांचे मनोरंजन
व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.
सोबतच नागरिकांमधील कला गुणांना वाव मिळवा यासाठी हास्य कवी संमेलन दिवाळी पहाट, लोकनेते आमदार
लक्ष्मणभाऊ जगताप करंडक “ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा”, पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ढोल ताशा वाद्य
स्पर्धा, विजयादशमी निमित्त महाभोंडला व रावण दहन सोहळा आयोजित केला जातो.
आपल्या समृद्ध धार्मिक परंपरा जपल्या पाहिजेत आपणां सर्वांना अध्यात्मातून नवी उर्जा मिळावी समाजामध्ये
पुन्हा समृद्धी नांदावी यासाठी कीर्तन महोत्सव, दि.११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०१२ - विश्वसंत सदगुरू
श्री. वामनराव पै यांच्या शहानपण देगा देवा या विषयावर आनंदमेळावा. (दररोज ३० हजार नामधारकांना लाभ.)
दि.१० डिसेंबर २०२२ ब्रम्हकुमारिज शिवानी दीदी यांचे संकल्प से सिद्धी व्याख्यान (१५ हजार नागरीक
उपस्थित) तसेच दत्तजयंती निमित्त श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम, कासारवाडी येथे प्रतिवर्षी सलग ८ दिवस
भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन, समाज प्रबोधनपर व्याख्याने, पंढरपुर वारी व दिंडी आदी कायक्रमाचे आयोजन
श्री शंकर जगताप यांच्या पुढाकाराने केले आहे.
परमपूज्य पंडित मिश्राजी (सिहोर वाले) यांच्या
उपस्थितीत “भव्य शिवपुराण कथेचे आयोजन” १५ सप्टेंबर २०२३ – ते २२ सप्टेंबर २०२३ या ७ दिवसांमध्ये १८ ते
२० लाख नागरिकांनी घेतला लाभ.श्री शंकर जगताप यांच्या माध्यमातून रामजन्मभूमी अयोध्या येथे साकारण्यात
आलेल्या भव्य राममंदिर दर्शनासाठी पिंपरी चिंचवड शहरातून (पिंपरी चिंचवड शहर ते अयोध्या पर्यंत) २०० आणि
मावळ लोकसभेतून १४०० नागरिकांना मोफत दर्शनाची व्यवस्था करून देण्यात आली. तसेच प्रभू श्री राम यांच्या
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संत मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवड. येथे भव्य सामुहिक
रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजित केला त्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
सांप्रदायिक क्षेत्र
रोजगार क्षेत्र...
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांना नोकरी मिळवताना येणाऱ्या अडचणी लक्षात त्यांच्यातील कौशल्य विकास व्हावा यासाठी पुढाकार घेण्यात आला. तसेच दि. ०४ डिसेंबर २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातील अनेक गरजू तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आणि दिव्यांग बांधवांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करून जवळपास ४५०० युवकांना चांगल्या कंपनीत जॉब मिळवून देण्यात अग्रेसर भूमिका घेतली.